महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिथून चक्रवर्तींचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, या चित्रपटात झळकणार - bad boy

मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'बॅड बॉय' या चित्रपटातून तो चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावणार आहे. यात नमाशीच्या अपोझिट अमरीन कुरेशी झळकणार आहे.

मिथून चक्रवर्तींचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

By

Published : May 24, 2019, 3:51 PM IST

मुंबई- ९० च्या दशकात बॉलिवूडवरती अधिराज्य गाजवणाऱ्या मिथून यांनी आपल्या जबरदस्त अंदाजाने अनेकांना भूरळ घातली. त्यांच्या चाहत्यांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. मिथून नुकतेच ताश्कंत फाईल्स चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता यापाठोपाठ त्यांचा मुलगाही प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

मिथून यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'बॅड बॉय' या चित्रपटातून तो चित्रपटसृष्टीत आपलं नशीब आजमावणार आहे. यात नमाशीच्या अपोझिट अमरीन कुरेशी झळकणार आहे. अमरीन ही निर्माता साजिद कुरेशी यांची मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आणि बंगळुरूमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण केलं जाणार आहे.

राजकुमार संतोषी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते म्हणाले, नमाशीने जेव्हा हा चित्रपट साईन केला तेव्हा मिथून बाहेर देशात होते. मात्र, भारतात परतताच त्यांनी आमची भेट घेऊन याबद्दल चर्चा केली. निर्मात्यांनी हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details