मुंबई- अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन आणि क्रिती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'मिशन मंगल' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या सिनेमाच्या प्रदर्शनाआधी आता यातील कलाकारांनी चित्रपटाबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
विद्या म्हणते स्क्रीप्ट वाचल्यानंतर मंगळ मोहिमेच्या यशाचं सत्य समजलं - अक्षय कुमार
या चित्रपटाबद्दल बोलताना विद्या म्हणाली, सगळे असं समजतात, की मंगळयान मोहिमेच्या यशात केवळ महिलांचा वाटा आहे आणि हे केवळ महिलांमुळेच शक्य झालं. मात्र, चित्रपटाची कथा वाचताना माझ्या हे लक्षात आलं, की महिलांसोबतच या मोहिमेत पुरूषांचाही समान वाटा आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना विद्या म्हणाली, सगळे असं समजतात, की मंगळयान मोहिमेच्या यशात केवळ महिलांचा वाटा आहे आणि हे केवळ महिलांमुळेच शक्य झालं. मात्र, चित्रपटाची कथा वाचताना माझ्या हे लक्षात आलं, की महिलांसोबतच या मोहिमेत पुरूषांचाही समान वाटा आहे. प्रत्येकाने या मोहिमेच्या यशासाठी सारखेच काम केले आहे.
तर अक्षय कुमार म्हणाला, या सिनेमाचे शीर्षक सुरूवातीला मंगल महिला मंडल असं होतं. मात्र, नंतर यात बदल करून ते 'मिशन मंगल' करण्यात आलं. तर तापसीनं या शीर्षकाबद्दल बोलताना म्हटलं, की या सिनेमासाठी विचारणा करताना मला म्हटलं गेलं होतं, की तू फक्त चित्रपटाचं नाव ऐक. पण नंतर या नावात बदल करण्यात आला कारण यात शरमन जोशी, अक्षय कुमार आणि इतरही अनेक पुरूषांच्या भूमिका होत्या. त्यामुळे आम्ही चित्रपटाला मंगल महिला मंडल हे नाव देऊ शकत नव्हतो.