मुंबई- बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या यशाच्या शिखरावर आहे. अक्षयचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत असतानाच त्याच्या मिशन मंगल सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. या सिनेमातून अक्षयनं आपला स्वतःचाच एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.
मिशन मंगल ठरला द्विशतक करणारा अक्षयचा पहिलाच सिनेमा - स्वातंत्र्य दिन
भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असलेला मिशन मंगल स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे.
भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित असलेला मिशन मंगल स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनानंतर चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहे. सिनेमानं आतापर्यंत १९७. ३७ कोटींची कमाई केली आहे.
सिनेमा २०० कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत असून पुढील २ दिवसात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसवर द्विशतक होईल. यासोबतच हा चित्रपट अक्षयच्या फिल्मी करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अक्षयच्या एकाही सिनेमानं याआधी २०० कोटींचा गल्ला गाठलेला नाही.