मुंबई- भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित मिशन मंगळ सिनेमा स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, नित्या मेनन आणि क्रिती कुल्हारी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
मिशन मंगलची १५० कोटींकडे वाटचाल, जाणून घ्या कमाई - सुपरहिट सिनेमा
या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले असून शुक्रवारपर्यंत सिनेमानं १३५.९९ कोटींचा गल्ला जमावला आहे. हा सिनेमा लवकरच १५० कोटींचा गल्ला पार करणार असून चित्रपटानं अक्षयच्या केसरी सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड तोडले
या सिनेमानं दुसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण केले असून शुक्रवारपर्यंत सिनेमानं १३५.९९ कोटींचा गल्ला जमावला आहे. हा सिनेमा लवकरच १५० कोटींचा गल्ला पार करणार असून चित्रपटानं अक्षयच्या केसरी सिनेमाचे बॉक्स ऑफिसवरील कमाईचे रेकॉर्ड तोडले असल्याचं चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलं आहे.
हा सिनेमा अक्षयचा आतापर्यंतचा बिगेस्ट ओपनर ठरला आहे. निखील अडवाणी यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा आता आणखी कोणते नवे विक्रम रचणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.