महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘मिस वर्ल्ड’ भारतीय हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनास अनेक गोष्टींमध्ये पारंगत - Hollywood star Priyanka Chopra Jona

अभिनेत्री प्रियंका चोप्रा अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे. अभिनयाशिवाय ती गायन, लेखन, निर्मिती या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात ती यशस्वी झालीय. आता तिने न्यूयॉर्क मध्ये ‘सोना’ नावाचं भारतीय पदार्थ मिळणारं रेस्टॉरंट सुरु केलंय. याचा लाभ तिलाही मिळणार आहे कारण भारतीय पदार्थांवर तिचे प्रचंड प्रेम आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा जोनास

By

Published : Mar 15, 2021, 1:38 PM IST

मुंबई - ‘मिस वर्ल्ड’ प्रियांका चोप्रा अनेक गोष्टींमध्ये पारंगत आहे. तिने अभिनय, निर्मिती, लेखन यासोबतच बिझनेस वूमन म्हणूनही नाव कमावलंय. तिने ‘अनोमलि’ नावाची ‘हेयरलाईन केयर’ ही एक नवीन कंपनी सुरु केलीय. प्रियांका स्वतःला ‘फूडी’ म्हणवून घेते. अमेरिकेत वास्तव्यास असल्यामुळे ती भारतीय व्यंजनं ‘मिस’ करते. त्यामुळेच कदाचित तिने न्यूयॉर्क मध्ये ‘सोना’ नावाचं भारतीय पदार्थ मिळणारं रेस्टॉरंट सुरु केलंय. नुकतीच तिने वास्तुशांती केली व काही दिवसांतच ते कार्यरत होईल ज्यात प्रख्यात शेफ हरी नायकने खास भारतीय पदार्थांचा मेनू सेट केलाय. आता प्रियंकाला भारतीय जेवण खावेसे वाटते तर नेहमीसारखे मन मारावे लागणार नाही.

प्रियांका चोप्रा जोनास
हे झाले तिच्या स्वतःबद्दलचे. परंतु ही हरहुन्नरी अभिनेत्री सामाजिक बांधिलकीही जपत असते. सध्या ‘बिट्टू’ नावाच्या शॉर्ट फिल्म ने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय जी ऑस्कर च्या शर्यतीत आहे. या फिल्ममधे भारतातील दुर्गम गावातील मुलींच्या प्राथमिक शिक्षणाबद्दल मते नोंदवली आहेत. यात राणी आणि रेणु कुमारी या दोन मुलींनी उत्कृष्ट नैसर्गिक अभिनय केलाय. त्यांच्या शिक्षणासाठी, चित्रपटाला पाठिंबा देणारा सिनेमा समूह असलेल्या ‘इंडियन विमेन राइजिंग’ ने आयोजित केलेल्या निधी संकल्पक कार्यक्रमाला प्रियंका चोप्रा जोनासने अलीकडेच ठोस पाठिंबा दर्शविला.‘इंडियन विमेन राइझिंग’ सोबत एकता कपूर, गुनीत मोंगा, ताहिरा कश्यप खुराना आणि रुचिका कपूर शेख जोडल्या गेलेल्या आहेत आणि ती संस्था 'एज्युकेट गर्ल्स यूएसए' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने निधी गोळा करीत असून राणी आणि रेणू कुमारी यांच्या शिक्षणासाठी निधी देणार आहे ज्याला प्रियांकाचही आर्थिक, नैतिक, सामाजिक पाठिंबा आहे. ग्लोबल आयकॉन आणि युनिसेफ ची सदभावना राजदूत प्रियांका चोप्रा जोनास हिचा अशाप्रकारचा पाठिंबा मिळाल्याने या मोहिमेला पाठबळ मिळालेय. तिने इतरांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे.
प्रियांका चोप्रा जोनास
अजून एक महत्वाची गोष्ट जी चित्रपटसृष्टीला आणि भारतालाही अभिमानास्पद वाटेल आणि ती म्हणजे येत्या सोमवारी प्रियांका चोप्रा जोनास आपला पती निक जोनास समवेत ९३ व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर करणार आहे. कोविड नियमांमुळे हे ती आपल्या लंडन येथील घरातूनच करणार आहे. भारताला पुन्हा एकदा जागतिक स्तरावरील नेत प्रियंका चोप्रा सोमवारी इंग्लंमधील तिच्या घरीच ऑस्कर पुरस्कारासाठीची घोषणा करणार आहे. बहुआयामी ‘मिस वर्ल्ड’ भारतीय हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा जोनासच्या बहूवैशिष्ट्यांपैकी या काही गोष्टी.

ABOUT THE AUTHOR

...view details