मुंबई- 'कबीर सिंग' चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून शाहिद कपूर चांगलाच चर्चेत आहे. अशात आज शाहिद आणि मीराच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या खास दिवशी मीराने शाहिदसोबत एक फोटो शेअर करत त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तू माझं जग बनलास, लग्नाच्या वाढदिवशी मीरानं शाहिदला दिल्या खास शुभेच्छा - zhen
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१६ ला मीशाचा जन्म झाला. ती आता दोन वर्षांची झाली आहे. तर शाहिद आणि मीराचा मुलगा झैन आठ महिन्यांचा आहे.
या फोटोला तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. तू माझं जग बनलास आणि मी तुझ्याभोवती गोल फिरायला लागले, असं तिनं आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. मीरा राजपूत अनेकदा शाहिदसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावरून शेअर करत असते.
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न ७ जुलै २०१५ ला झाले. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१६ ला मीशाचा जन्म झाला. ती आता दोन वर्षांची झाली आहे. तर शाहिद आणि मीराचा मुलगा झैन आठ महिन्यांचा आहे. दरम्यान चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच प्रदर्शित झालेला 'कबीर सिंग' चित्रपट शाहिदच्या फिल्मी करिअरमधील पहिलाच द्विशतक करणारा चित्रपट ठरला आहे.