मुंबई- शाहिद कपूर आणि मीरा राजूपत यांची जोडी मोस्ट लव्हेबल जोडी म्हणून ओळखली जाते. चित्रपटात कितीही व्यग्र असला तरी शाहिद आपल्या कुटुंबासाठी नेहमीच वेळ काढताना दिसतो. शाहिद आणि मीराला मीशा आणि झेन अशी दोन मुलं आहेत.
मीरा राजपूतनं शेअर केला लेक झेनचा गोंडस फोटो - shahid kapoor
शाहिद अनेकदा आपल्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अशात आता मीरानेही आपल्या लेकाचा गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
शाहिद अनेकदा आपल्या लाडक्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अशात आता मीरानेही आपल्या लेकाचा गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. बेबी बिअर असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं असून झेनचा हा निरागसपणा अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
झेन आता दहा महिन्यांचा झाला असून नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये बोलताना झेन आपल्यापेक्षा खूप सुंदर दिसत असल्याचे शाहिदने म्हटले होते. दरम्यान चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास काही दिवसांपूर्वीच शाहिद 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.