मुंबई - बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. यानिमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. यादिवसात मिलिंद आपली पत्नी अंकिता कुँवरसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद लुटत आहे. मिलिंदने वाढदिवसाच्या निमित्ताने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. याची सध्या जोरदार चर्चा आहे. यात तो विवस्त्र बीचवर धावताना दिसत आहे.
मिलिंद सोमण यांनी हा फोटो शेअर केला आणि लिहिलंय, "मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा." त्याने फोटोसह # ५५असे लिहिले आहे, हा त्याच्या वाढदिवसाचा आकडा आहे. पत्नी अंकिताने त्याचा हा फोटो टिपला आहे. अंकिताने मिलिंदच्या वाढदिवशी एक गोड चिठ्ठीही लिहिलेली आहे.