महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 19, 2019, 6:19 PM IST

ETV Bharat / sitara

FWICE कडून मिकाला दिलासा, बाजू मांडण्याची दिली संधी

मिकानेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिवारी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणत आहेत, मंगळवारी आमचं मिका सिंगसोबत एक चर्चासत्र होणार आहे. यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येईल. त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी यात स्पष्ट केलं.

FWICE कडून मिकाला दिलासा

मुंबई- गायक मिका सिंगला पाकिस्तानात परफॉर्म केल्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष बी एन तिवारी यांनी मिकाची मागणी मान्य करत, त्याला आपली बाजू मांडण्यासाठी काही काळ वेळ दिला आहे.

मिकाने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या निकटवर्तीयाच्या लग्नात हजेरी लावून परफॉर्म केलं होतं. यानंतर बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या ‘ऑल इंडिया सिने एप्लॉईज असोसिएशन’ आणि ‘वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज असोसिएशन’ या दोन्ही संघटनांनी स्वतंत्र पत्रक काढून मिकावर बहिष्कार घालण्याचं आवाहन संपूर्ण इंडस्ट्रीला केलं होतं. अशात मिकानं बी एन तिवारी यांना पत्र लिहून आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. यानंतर असोसिएशन जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल..असं मिका म्हणाला.

आता मिकानेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तिवारी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणत आहेत, मंगळवारी आमचं मिका सिंगसोबत एक चर्चासत्र होणार आहे. यानंतरच काय तो निर्णय घेण्यात येईल. त्याची बाजू ऐकून घेतल्याशिवाय या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी यात स्पष्ट केलं. मिकानं तिवारींचा हा व्हिडिओ शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. यासोबतच मी आतापर्यंत देशासाठी आणि त्यातील नागरिकांसाठी ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टी करत आलो, तशाच यापुढेही करेल, असंही मिका म्हटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details