मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम याने शनिवारी 'मेरा भारत महान' अशी एक कविता सोशल मीडियावर शेअर केली. या कवितेची बॉलीवूड मधील बऱ्याच कलाकारांनी प्रशंसा केली आहे. जॉनने या कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लाॉकडाऊन सुरू आहे, त्या परिस्थितीवर आधारीत ही कविता आहे.
सध्या देशभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊन मुळे अनेक गोरगरीब, मजूर, शेतकरी यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलीस यंत्रणा, सफाई कर्मचारी, अन्न पुरवठा कामगार हे सर्व अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे या सर्वांना प्रेरणा देण्यासाठी जॉनने एका कवितेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या कवितेतून त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
मिलाप झवेरी यांनी ही कविता लिहिली आहे.