मुंबई - सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला होता. १४ जूनला त्याने मुंबईत आत्महत्या केली होती. त्यानंतर कुटुंबियांच्या उपस्थितीत त्याच्यावर मुंबईतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या अस्थींचे विसर्जन पाटणा येथील गंगा नदीमध्ये कऱण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घरी प्रर्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिने त्याच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले होते. यासंबंधीचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा - कोणावर तरी आरोप करुन सुशांतच्या मृत्यूला जबाबदार धरू नये: सोनू सूद
रतन राजपूतने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने मनोगत व्यक्त केलंय. तिनं म्हटलंय की, ती तिथे सुशांतच्या कुटुंबियांची हिम्मत वाढवण्यासाठी गेली होती मात्र ती स्वतःचा हिम्मत घेऊन परतली. रतन म्हणते, ''मी सुशांतच्या वडिलांना भेटले. त्याच्या बहिणीलाही भेटले. सुशांतचे वडिल पूर्ण वेगळे आहेत. मी त्यांना पाहून चकित झाले. ते किती शांत व साकारात्मक आहेत. त्यांना भेटल्याने माझी हिम्मत वाढली असे म्हणू शकते.''