मुंबई - 'दबंग ३' या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'रज्जो'ची भूमिका साकारत आहे. आज करवा चौथचा सण साजरा होत आहे. करवा चौथ हा उत्तर भारतीय हिंदू सण आहे. आश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुरोग्यासाठी पूर्ण दिवस उपवास करतात. संध्याकाळी चंद्र उगवल्यावर चाळणीतून प्रथम चंद्राचे दर्शन व नंतर पतीचा चेहरा पाहतात. क्वचित अविवाहित स्त्रियाही आपल्या इच्छित पतीसाठी हे व्रत करतात. दंबगची रज्जोही हा सण साजरी करीत असल्याचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.
'दबंग' गर्ल 'रज्जो'चा करवा चौथ - दबंग ३ पोस्टर
सलमान खानच्या 'दबंग ३' या आगामी चित्रपटातील रज्जोचा म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचा फोटो शेअर केलाय. या मध्ये रज्जो हातात चाळण घेऊन चंद्राकडे पाहाताना दिसत आहे. करवा चौथच्या निमित्ताने हे पोस्टर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सोनाक्षी सिन्हा
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सलमान खानच्या 'दबंग ३' या आगामी चित्रपटातील रज्जोचा म्हणजेच सोनाक्षी सिन्हाचा फोटो शेअर केलाय. या मध्ये रज्जो हातात चाळण घेऊन चंद्राकडे पाहाताना दिसत आहे.
महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिचीदेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात तिची आणि सलमान खानची केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवा करत आहेत. २० डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.