मुंबई - जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयते' चित्रपटाचा सीक्वल 'सत्यमेव जयते'चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी दिग्दर्शक मिलाप जव्हेरी खूप उत्सुक आहेत. विशेष म्हणजे सत्यमेव जयते २ चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी मास्कची निर्मिती केली आहे. याचे वितरण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान फिल्म क्रूमध्ये करण्यात येणार आहे. ऑगष्ट महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होईल.
काही दिवसापूर्वीच 'सत्यमेव जयते'च्या दुसऱ्या भागातील जॉन अब्राहमचा लूक प्रसिद्ध झाला होता. यात तो पोलीस वर्दीत दिसला होता.
कोरोना व्हायरसमुळे देश लॉकडाऊन करण्यात आलाय. यामुळे सर्व चित्रपटांची शूटिंग थांबली आहेत. जॉनच्या 'सत्यमेव जयते २' चेही शूटिंग थांबले आहे. हा चित्रपट भूषण कुमारच्या बॅनरखाली बनत आहे. याचे शूटिंग आता ऑगस्ट महिन्यात सुरू होईल. शूटिंगसाठी अनेक निर्बंध शासनाने घातले आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग बरोबरच मास्क घालणे अत्यवश्यक आहे. यासाठी खास मास्कची निर्मिती करण्यात आली आहे.
जॉन अब्राहमचा विचार करता त्याच्या हातात अटॅक, एक विलेन -2, मुबंई सागा, हे चित्रपट आहेत. संजय गुप्ताच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला 'मुंबई सागा' हा चित्रपट १९ जून २०२०ला रिलीज होणार आहे. मोहित सुरी दिग्दर्शित करीत असलेला 'एक विलेन 2' चित्रपट 8 जनवरी 2021ला रिलीज होईल. यात जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी यांच्या भूमिका आहेत.