मुंबई- कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेशिवाय केवळ अभिनेत्रीच्या जोरावर चित्रपट हीट होणं ही कल्पनाही काही वर्षांपूर्वी कोणी केली नसेल. मात्र, हे समीकरण मोडीत काढलं 'क्वीन', 'तनु वेड्स मनु' आणि 'मर्दानी'सारख्या चित्रपटांनी. आता याच सुपरहीट 'मर्दानी' चित्रपटाचा सिक्वलही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
२०१४ साली राणीची प्रमुख भूमिका असलेला ‘मर्दानी’ चित्रपट आला. या चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय या गुन्हे विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत राणी मुखर्जी समाजातील अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्राफीकींगविरोधात झगडताना दिसली. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि राणीच्या अभिनयाचंही कौतुक झालं. अशात आता चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटींगलाही सुरूवात झाली आहे.