महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'मनी हाईस्ट'मधील 'बेल्ला सिओ'च्या कडक मराठी व्हर्जनची चर्चा! - web series 'Money High' is a hit

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन कोणीच आयुष्यात विसरणार नाही. अनेकांनी खूप काही गमावलं, कमावलं, माणुसकी दिसून आली, चांगल्या कामात एकी सुद्धा दिसून आली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी बरेच सिनेमे, वेब सिरीज आल्या . त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक वेबसिरीज पैकी एक 'मनी हाईस्ट' ही वेब सिरीज विशेष गाजली. या वेब सिरीजमधील 'बेल्ला सिओ' हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं आणि खूप कमी वेळेत सर्वांच्या पसंतीस सुद्धा पडलं.

song from 'Money High' is a hit
'मनी हाईस्ट'मधील गाणे हिट

By

Published : May 14, 2021, 4:54 PM IST

नवीन वर्षात सर्वकाही सुरळीतपणे सुरू होईल अशी आशा जनतेने ठेवली होती, पण सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागला आणि 'हिस्ट्री रिपीट्स' असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी जी कोरोनाची लाट आली ती गंभीर होतीच पण आता ही दुसरी लाट महाभयंकर आहे आणि हे आपण सर्वजण पाहतोय. असं असूनही काही ठिकाणी गर्दी आणि मास्क हनुवटीच्या खाली आहेच. लोकांना त्यांच्या पद्धती नेच समजावून सांगण्यासाठी 'कडक एंटरटेमेंट' घेऊन आले आहे 'बेल्ला सिओचं कडक मराठी व्हर्जन'.

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या 'अहमदनगर फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेलं 'बेल्ला सिओचं कडक मराठी व्हर्जन ' ' कसा ला' गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल मुनोत यांची आहे.

या गाण्याच्या संकल्पनेबद्दल बोलताना स्वप्निल मुनोत यांनी सांगितले, "हल्ली काही लोकांना गोष्टी, परिस्थिती फिल्मी पद्धतीने समजवून सांगितल्यावर त्या जास्त लवकर समजतात असं एक माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. एक चांगला संदेश समाजात पोहचावा, त्या गाण्यातून लोकांनी बोध घ्यावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पाऊलं उचलावी, स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्यावी हे सांगण्या मागचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आमचं हे 'बेल्ला सिओचं कडक मराठी व्हर्जन'. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट पाहिली आणि आता 'बस्स, पुरे!' असं झालंय. त्यात तिसरी लाट येण्याची पण शक्यता वर्तवली जात आहे, हे सगळं आपण थांबवू शकतो फक्त मूलभूत काळजी घेऊन. त्यामुळे या गाण्याच्या मार्फत मी सर्वांना एकच विनंती करतो की, कृपया मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा आणि गरज असल्याशिवाय बाहेर जाणं टाळा."

कडक एंटरटेमेंट, नरेंद्र फिरोदिया, मयुरी स्वप्निल मुनोत आणि श्रुती अक्षय मुनोत हे या गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. तसेच, गाण्याचं दिग्दर्शन संदीप दंडवते यांनी केले असून गाण्याचे बोल अतिश हरेल आणि संजा यांनी लिहिले आहे. वोकल आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निरंजन पेडगांवकर यांनी सांभाळली आहे. कडक मराठीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले कलाकार महेश काळे, लहुकुमार चोभे, वैभव कुऱ्हाडे, तेजस अंधाळे, कन्हैया तिवारी, रोहित पोफाळे यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

एकंदरीत, या गाण्याच्या निमित्ताने 'कडक एंटरटेमेंट' च्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी एक महत्त्वाचा, सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा - गरजू पेशंट्सना ऑक्सिजन मिळावा यासाठी हर्षवर्धन राणेने विकली बुलेट

ABOUT THE AUTHOR

...view details