मुंबई- माजी ब्युटी क्वीन आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मानुषी छिल्लरने तिच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. मानुषीने एक फोटो शेअर केलाय. इन्स्टाग्रामवरील या फोटोत ती मेकअप रुममधील आरशासमोर सेल्फी घेताना दिसली आहे.
मानुषी छिल्लरने सुरू केले ‘पृथ्वीराज’चे शूटिंग - माजी ब्युटी क्वीन मानुषी छिल्लर
अभिनेत्री मानुषी छिल्लर ‘पृथ्वीराज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. आज तिने शूटिंगला सुरुवात केल्याचे चाहत्यांना कळवले आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकणार आहे.
मानुषी छिल्लरने सुरू केले ‘पृथ्वीराज’चे शूटिंग
अक्षयने 12 ऑक्टोबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली होती. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित ‘पृथ्वीराज’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर मानुषी संयोगिताच्या भूमिकेत दिसणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत शूटिंग सुरू आहे. मानुषी 13 ऑक्टोबरपासून शूटिंगमध्ये सामील झाली आहे, तर संजय दत्त दिवाळीनंतर शूटिंगवर पुनरागमन करेल.