मुंबई - बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयीच्या वडिलांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, मनोजच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा मनोज बाजपेयीला त्यांच्या वडिलांच्या आजाराची बातमी मिळाली, तेव्हा तो केरळमध्ये शुटिंग करीत होता. बातमी कळताच शुटिंग सोडून दिल्लीला रवाना झाला. मनोज बाजपेयीचे वडील राधाकांत बाजपेयी हे शेतकरी आहेत.
मनोज बाजपेयी आजकाल केरळमध्ये आपल्या नवीन प्रोजेक्टचे शुटिंग करीत आहे. अलिकडेच त्याने इंदूरमध्ये स्वयंघोषित समिक्षक कमाल आर खानच्या विरोधात मानहानी याचिका दाखल केली होती. त्यामुळे तो चर्चेत आला होता.
कमल आर खान याने 'द फॅमिली मॅन -2' या वेबसीरिजबाबत मनोज वाजपेयीवर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मनोज बाजपेयी शेवटचा स्पाय थ्रिलर वेब सिरीज 'डायल 100' आणि 'द फॅमिली मॅन -2' मध्ये दिसला होता.