मुंबई- 'संजू' या चित्रपटात संजय दत्तच्या आईची भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री मनीषा कोईराला आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'प्रस्थानम' चित्रपटात ती झळकणार असून या सिनेमातील तिचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
'संजू'नंतर मनीषा कोईराला पुनरागमनासाठी सज्ज, पाहा फर्स्ट लूक - जॅकी श्रॉफ
पोस्टरमधील तिचा लूक पाहता चित्रपटात ती एखाद्या राजकीय व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचं दिसत आहे. द क्वीन असं तिच्या या पोस्टरवर लिहिलं आहे. सिनेमात संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत
पोस्टरमधील तिचा लूक पाहता चित्रपटात ती एखाद्या राजकीय व्यक्तीची भूमिका साकारणार असल्याचं दिसत आहे. द क्वीन असं तिच्या या पोस्टरवर लिहिलं आहे. यात मनीषा कोईराला संजय दत्तच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
या सिनेमात संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. चित्रपट प्रस्थानम याच तामिळ राजकीय थ्रिलर चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. सिनेमाची निर्मिती संजयची पत्नी मान्यता दत्त करणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन देवा कट्टा करणार असून २० सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.