महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मनीष पॉलने सुरू केले 'जुग जुग जियो'चे शूटिंग - 'जुग जुग जियो' या चित्रपटाचे शूटिंग सुरू

अभिनेता मनिष पॉल लवकरच धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात पदार्पण करणार आहे. 'जुग जुग जियो' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याचे तसेच त्यात वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असल्याचे त्याने सोशल मीडियावर म्हटले आहे.

Manish Paul
मनीष पॉल

By

Published : Nov 28, 2020, 1:42 PM IST

मुंबई - अभिनेता मनीष पॉल याने वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात निती कपूर आणि अनिल कपूर हेदेखील आहेत. हा चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे.

मनीषने कियारा, वरुण आणि राज मेहता यांच्यासह इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा - राजकुमार राव बनला परेश रावलसोबत 'शतरंज का खिलाडी'

त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "माझी आई नेहमी म्हणते, जुग जुग जियो, हे तर होणारच होते. माझा पहिला दिवस, धर्मा प्रॉडक्शनसोबत माझा पहिल्या चित्रपटाचा पहिला दिवस. अनिल कपूर सर, नीतू मॅम, कियारा, वरुण, प्राजक्ता कोली आणि दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करण्यासाठी सुपर उत्साही आणि रोमांचित आहे."

हेही वाचा - तलावाच्या रेड आउटफिटमध्ये पोज देतानाचा सोनाक्षी सिन्हाचा फोटो व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details