मुंबई -अभिनेत्री मंदिरा बेदीच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. मंदिराने सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवीन सदस्याचे स्वागत केले आहे. मंदिरा आणि तिचा चित्रपट निर्माता पती राज कौशल यांनी जुलै महिन्यात एका चार वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. त्याविषयी तिने आता माहिती दिली आहे.
मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. आता त्यांनी मुलीला दत्तक घेतले आहे. काल (रविवारी) मंदिराने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट करत मुलगी दत्तक घेतल्याचे सांगितले. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, २८ जुलैला दाम्पत्याने मुलीला दत्तक घेतले. त्यांनी मुलीचे नाव 'तारा बेदी कुशल' असे ठेवले आहे.