महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मानव कौलची अखेर कोविड टेस्ट आली निगेटिव्ह! - मानव कौलची कोविड टेस्ट

अभिनेता मानव कौलची कोरोनाशी झुंज यशस्व ठरली आहे. त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. २३ सप्टेंबरला त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या आणि प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले आहेत.

Manav Kaul
मानव कौल

By

Published : Oct 5, 2020, 5:46 PM IST

मुंबई - अभिनेता मानव कौल कोरोनापासून मुक्त झाला आहे. त्याची २३ सप्टेंबरला कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. दोन आठवड्यापेक्षा कमी काळात त्याने कोरोनाचा पराभव केला असून आता तो या आजारातून बरा झाला आहे. मानव कौलने आपल्या तब्येतीबद्दलचे अपडेट सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

''मी कोविड पॉझिटिव्ह होता आणि आता माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी निगेटिव्ह असल्याचा पहिल्यांदाच आनंद झाला आहे,'' असे त्याने लिहिलंय.

या कठिण काळात त्याच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. मानवने आपले मित्र डॉ. ब्रिजेश्वर सिंग आणि डॉ. अम्मर खान यांचे उपचारादरम्यान केलेल्या सेवेबद्दल विशेष आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details