महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मलायकाच्या नव्या फोटो शूटने सोशल मीडियावर वादळ - Maliaka Arora latest news

अभिनेत्री मलायका अरोराचे फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तिच्या या फोटोजना चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय.

Maliaka Aroras new photo shoot
मलायका अरोराचे फोटोशूट

By

Published : Dec 14, 2019, 11:09 PM IST


मुंबई - अभिनेत्री मलायका अरोराच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियामध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत.

मलायका या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहे. एका दिवसातच याला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळालाय.


मलायकाच्या या फोटोजवर चाहत्यांचे लाईक्स आणि कमेंट्स यांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.

मलायका नेहमी प्रसिध्दीच्या झोतात राहत असते. आपल्या नव्या कामाचे फोटो ती नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करीत असते.

काही दिवसांपूर्वी मलायकाने 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोचे गीता कपूर आणि टेरेन्स लुईस यांच्यासह परीक्षण केले होते.

मलायका आणि अर्जुन कपूर यांचे प्रेमप्रकरण सध्या सिनेजगतात चर्चेचा विषय आहे. त्यांनी अद्याप लग्न कधी करायचे हे ठरवलेले नसले तरी त्यांनी ही गोष्ट लपवलेली नाही.

योग्यवेळी लग्नाचा निर्णय सांगितला जाईल, असे तिने एका मुलाखतीत म्हटले होते. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जुनने फोटो शेअर करीत मलायकाला शुभेच्छा दिल्या होत्या. मलायकाच्या या नव्या फोटाशूटने तिचे चाहते सुखावले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details