मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या नव्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे तिच्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरू केलाय. बॉलिवूड अभिनेत्यांच्याही याला प्रतिक्रिया मिळत आहेत. सध्या हा फोटो व्हायरल झालाय.
पाहा, मलायकाने शेअर केलेला धमाकेदार फोटो, लाखो नेटकरी झाले फिदा - Maliaka Arora
मलायका अरोराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता तो आता व्हायरल झालाय. अवघ्या काही तासात सुमारे ३ लाख लाईक आणि कॉमेंट्स मिळाले आहेत.
मलायका अरोरा
मलायकाने शेअर केलेल्या फोटोत ती समुद्राच्या पाण्यात उभी असलेली दिसते. या फोटोची लोकप्रियता समजून घेण्यासाठी एकच निकष आपण लावू शकतो तो म्हणजे फोटो शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासात सुमारे ३ लाख लाईक आणि कॉमेंट्स मिळाले आहेत. खरंतर मलायकाचा हा फोटो जुनाच आहे, परंतु लोकांचे लक्ष वेधणारा आहे.