महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट वादात; शीर्षक बदलण्याची आमदार अमिन पटेल यांची मागणी - आमदार अमिन पटेल

बॉलिवूडमधील स्टार चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची मागणी आमदार अमिन पटेल यांनी केली आहे.

गंगूबाई काठियावाडी
गंगूबाई काठियावाडी

By

Published : Mar 10, 2021, 10:19 AM IST

मुंबई - काँग्रेसचे महाराष्ट्रातील आमदार अमीन पटेल यांनी संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. 'गंगूबाई काठियावाडी'नावामुळे काठियावाड शहराचे नाव बदनाम होत असल्याने या चित्रपटाचे नाव लगेचच बदलले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

1960 च्या दशकात कामठीपुरामधील गंगूबाई, सर्वात शक्तिशाली, प्रेमळ आणि आदरणीय महिलेपैकी एक होती. गंगुबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट्ट साकारत आहे. 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसेन झैदी यांच्या मुंबईच्या 'माफिया क्वीन्स'च्या पुस्तकातील एका अध्यायातून रूपांतरित झाला आहे. हा चित्रपट 30 जुलै रोजी देशभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल होईल.

गंगुबाईची भूमिका अभिनेत्री आलिया भट्ट साकारत आहे

कोण होती गंगूबाई काठियावाडी?

हुसैन जैदी यांनी 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' पुस्तकानुसार, गंगूबाई गुजरातमधील कठियावाड येथील रहिवासी होती. गंगूबाईचं मुळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. 16 वर्षाची असताना गंगूबाईला अकाउंटन्टशी प्रेम झालं आणि लग्न करून ते दोघे मुंबईला पळून आले. मात्र, तिच्या नवऱ्यानेच तिला फक्त 500 रुपयांसाठी कोठ्यावर विकले. नंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details