मुंबई: माधुरी दीक्षितने आपल्या आयकॉनिक 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्याचा अनोखा मार्ग निवडला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात ती लोकप्रिय एकदोन तीन या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. तिचा हा डान्स पाहण्यासारखा आहे.
'तेजाब'ला ३१ वर्ष पूर्ण, माधुरीचा 'एक दो तीन'वर पुन्हा जलवा - Tejab dsong Ek Don Tin Tick Tock dance challenge
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या 'तेजाब' चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास क्षणाला माधुरीने एक दोन तीन गाण्यावर टीक टॉक चॅलेंज दिले आहे.
माधुरीने शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, " 'एक दो तीन'... माझ्यासाठी स्पेशल गाणे आहे. म्हणूनच मी टिक टॉकवर एका मजेदार डान्स चॅलेंजसह तेजाबला ३१ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करीत आहे. माझ्या स्टेप्सला मॅच करा आणि 'एक दो तीन' चॅलेन्ज पूर्ण करुन आपला व्हिडिओ शेअर करा. माझ्याकडून एक सरप्राईज मिळवा. चला नाचायला सुरूवात करा."
माधुरीशिवाय अनिल कपूरनेही ट्विट करीत काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, "३१ वर्षांच्या या चित्रपटात मी आणि माधुरीने भरपूर काही केले. मी हे वर्ष लक्ष्मीकांत प्यारेलाल यातील लक्ष्मीकांत आणि दिवंगत दिनेश गांधी यांना समर्पित करतो. त्यांनी एन. चंद्रांचे स्वप्न पूर्ण केले होते."