महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

B'day Spl: जाणून घ्या, धकधक गर्ल माधुरीबद्दलच्या काही खास गोष्टी - highest paid actress

धकधक गर्लचा आज ५२ वा वाढदिवस. माधुरीचा जन्म १५ मे १९६७ ला महाराष्ट्रात झाला. माधुरीने अवघ्या ३ वर्षांच्या वयात कथ्थक नृत्य शिकण्यास सुरूवात केली होती.

धकधक गर्लचा वाढदिवस

By

Published : May 15, 2019, 1:12 PM IST

मुंबई- आपलं सौंदर्य, नृत्य आणि हास्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धकधक गर्लचा आज ५२ वा वाढदिवस. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवूया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी -

बनायचे होते मायक्रोबायोलॉजिस्ट -
माधुरीचा जन्म १५ मे १९६७ ला महाराष्ट्रात झाला. माधुरीला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचे होते. यासाठी तिने मायक्रोबायोलॉजीची डिग्रीदेखील घेतली आहे.

एक उत्तम कथ्थक डान्सर -
नृत्य हा माधुरीचा लहानपणापासूनचा छंद आहे. तिने अवघ्या ३ वर्षांच्या वयात कथ्थक नृत्य शिकण्यास सुरूवात केली होती. यामुळेच पुढे ती एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर म्हणून ओळखली जावू लागली.

उत्तम कथ्थक डान्सर

अनेक चित्रपटांना मिळाले होते अपयश -
माधुरीचा १९८४ मध्ये आलेला 'अबोध' हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर तिचे 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी'सारखे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियतेचे शिखर गाठण्यास मदत केली. या चित्रपटातील 'एक दो तीन' गाणं तर आजही अनेकांच्या ओठी आहे.

गाण्यासाठी घातला होता ३० किलोचा ड्रेस -
माधुरीने 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेडे मोहे' गाण्यासाठी ३० किलोचा घागरा घातला होता. विशेष म्हणजे ३० किलोच्या या ड्रेसमध्ये माधुरीने डान्सदेखील केला होता. हा ड्रेस डिझायनर निता लुल्ला यांनी डिझाईन केला होता.

एका गाण्यासाठी घातला ३० किलोचा ड्रेस

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री -

सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
आपल्या करिअरच्या उंचावणाऱ्या आलेखादरम्यान माधुरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी तिने तब्बल २.७ कोटी इतके मानधन घेतले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details