महाराष्ट्र

maharashtra

मधुर भांडारकरने केली ‘इंडिया लॉकडाउन’ची घोषणा

चित्रपट निर्माता मधुर भांडारकर याने आपल्या आगामी ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे तो दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असून जानेवारी २०२१ मध्ये शुटिंग फ्लोअरवर जाईल.

By

Published : Dec 23, 2020, 2:17 PM IST

Published : Dec 23, 2020, 2:17 PM IST

Madhur Bhandarkar
मधुर भांडारकर

मुंबई - भारतात कोविड-१९ रोखण्यासाठी पहिल्यांदाच मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. यात अनेक प्रकारचे विदारक अनुभव सर्व क्षेत्रातील लोकांना आले. याच खऱ्या घटनांवर आधारित ‘इंडिया लॉकडाउन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा निर्माता मधुर भांडारकरने केली आहे.

चित्रपट समिक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. "माधुर भांडारकरने पुढील दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा केली आहे ... ही अधिकृत घोषणा आहे. या चित्रपटाचे शीर्षक असेल 'इंडिया लॉकडाउन'. खऱ्या घटनांवर आधारित हा चित्रपट असेल,'' असे तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

मधुर भांडारकरने केली ‘इंडिया लॉकडाउन’ची घोषणा

हेही वाचा - कुठे आणि कधी होणार सलमान-कॅटरिनाच्या 'टायगर ३' चे शुटिंग

पीजे मोशन पिक्चर्स आणि भांडारकर एंटरटेन्मेंट या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही समिक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले. चित्रपटाचे कास्टिंग सुरू आहे आणि जानेवारी २०२१ मध्ये ते शुटिंग फ्लोअरवर जाणार आहेत.

हेही वाचा - आयुष्यमान-वाणीने ४८ दिवसात आटोपले 'चंडीगड करे आशिकी'चे शुटिंग

ABOUT THE AUTHOR

...view details