महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अक्षय, तापसी अन् राजकुमारच्या 'या' चित्रपटांचा होणार बॉक्स ऑफिस क्लॅश - मौनी रॉय

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा मेड इन चायना चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र, बिग बजेट साहो चित्रपटासोबतची टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

'या' चित्रपटांचा होणार बॉक्स ऑफिस क्लॅश

By

Published : Aug 21, 2019, 4:16 PM IST

मुंबई- यावर्षीची दिवाळी सिनेरसिकांसाठी मेजवाणी ठरणार आहे. होय, अक्षय कुमारसह तगडी स्टारकास्ट असलेला हाऊसफुल्ल ४ चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला सांड की आँख चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर याच दरम्यान आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार राव आणि मौनी रॉय यांचा मेड इन चायना चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीला हा सिनेमा ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र, बिग बजेट साहो चित्रपटासोबतची टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

अशात आता दिवाळीच्या आठवड्यातच या तीन बहुचर्चित आणि तगडी स्टारकास्ट असलेल्या चित्रपटांची ही बॉक्स ऑफिसवरील टक्कर चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे, यात कोणता कलाकार बाजी मारणार आणि बॉक्स ऑफिसवर चांगला विक्रम बनवणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details