मुंबई - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांच्या 'मरजावां' या चित्रपटातील पहिलं गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आलं होतं. ही केवळ गाण्याची झलक होती. आता या गाण्याचे पूर्ण व्हर्जन रिलीज करण्यात आलंय.
'तुम ही आना' या गाण्यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री तारा सुतारिया यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री पाहायला मिळते. अभिनेत्री तारा सुतारियाने 'स्टुडंड ऑफ द ईयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर आता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ती 'मरजावां' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या 'तुम ही आना' या पहिल्याच गाण्यात तिची सिद्धार्थसोबतची रोमॅन्टिक ट्युनिंग पाहायला मिळते.