मुंबई- अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, या सर्व परिस्थितीत एक व्यक्ती कायम त्याच्या पाठीशी उभी राहिली. ही व्यक्ती म्हणजेच संजयची पत्नी मान्यता दत्त. मान्यता सार्वजनिक ठिकाणी असो वा इतर कोठे संजयसोबत अनेक ठिकाणी स्पॉट होत असते.
मान्यतानं शेअर केला संजयसोबतचा फोटो, कॅप्शन वाचून पडाल प्रेमात - अली फजल
अशा व्यक्तीच्या प्रेमात पडा जो तुमचा वेडेपणाही इन्जॉय करेल....अशा नको जो तुम्हाला बदलण्याचा आग्रह करेल, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनेकदा ती सोशल मीडियावर संजयसोबतचे फोटोही शेअर करत असते. अशात नुकताच तिनं शेअर केलेला एक फोटो प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. हा फोटो चित्रपटगृहातील असून फोटोत मान्यता संजयच्या खांद्यावर डोकं ठेऊन बसली आहे. या फोटोला तिनं कॅप्शनही दिलं आहे.
अशा व्यक्तीच्या प्रेमात पडा जो तुमचा वेडोपणाही इन्जॉय करेल....अशा नको जो तुम्हाला बदलण्याचा आग्रह करेल, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तर त्यांच्या या फोटोवर प्रस्थानममध्ये संजयसोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता अली फजलनं कमेन्ट केली आहे. देव तुम्हा दोघांना सुखी ठेवो आणि असंच वेडेपणा करत मुक्त जगा, असं तो म्हटला.