मुंबई - अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेला व अद्याप शीर्षक ठरलेले नसलेला चित्रपट 2023 च्या प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार होता. आता हा चित्रपट ८ मार्च २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाची घोषणा डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आली होती. तथापि, कोविड-19 महामारीमुळे शूटिंग आणि त्याचे रिलीज पुढे ढकलले गेले. हा चित्रपट कथितपणे एक रोमँटिक-कॉमेडी आहे, 'प्यार का पंचनामा' फ्रँचायझी आणि 'सोनू के टीटू की स्वीटी'साठी प्रसिद्ध असलेले लव रंजन याचे दिग्दर्शन आणि निर्मीत करणार आहेत.
लव फिल्म्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने हे अपडेट पोस्ट केले आहे. "रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश असलेला लव रंजनचा शीर्षक नसलेला आगामीचित्रपट होळीच्या निमित्ताने, 8 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल!'' असे पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे.