महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रिती झिंटाने नवीन वर्षाच्या पार्टीची झलक शेअर करीत दिल्या शुभेच्छा - प्रितीने 'हॅलो न्यू इयर' कॅप घातली

प्रीती झिंटाने नवीन वर्षाच्या पार्टीची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आणि शांतता, कल्याण आणि आनंदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे तिने नवऱ्याचा उल्लेख पतीपरमेश्वर असा केलाय. तिच्या डोक्यावर हॅप्पी न्यू इयरची कॅप आहे.

Preity Zinta
प्रीती झिंटा

By

Published : Jan 2, 2021, 6:21 PM IST

मुंबई - शांतता, निरोगीपणा आणि आनंदासाठी शुभेच्छा पाठवत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने नवरा आणि कुटुंबियांसोबत नव वर्ष साजरा करीत असतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

'कल हो ना हो' स्टार प्रितीने इंस्टाग्रामवर तिच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमधील एक आकर्षक फोटो शेअर केला आहे.

प्रिती झिंटाच्या इन्स्टाग्राम स्क्रिन शॉट

फोटोमध्ये प्रितीने 'हॅलो न्यू इयर' कॅप घातली असून सोबत पती जेने गुडइनफ दिसत असून त्याच्या डोळ्यावर चष्मा रंगवण्यात आला आहे. यातील एका डोळ्यावर २० आणि दुसऱ्यावर २१ लिहिले आहे. कुटुंबीयांसोबतचा हा मजेशीर फोटो शेअर करताना तिने हॅशटॅगमध्ये पती परमेश्वर असे लिहिले आहे.

तिच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा लिहून प्रिती झिंटाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. हे वर्ष प्रत्येकाला शांतता, निरोगीपणा, आनंद, चांगले आरोग्य आणि समृद्धी देईल अशी आशा आहे.'', असे लिहित तिने पती परमेश्वर असा हॅशटॅग वापरलाय.

हेही वाचा - अक्षय कुमारने शेअर केला नव्या वर्षातील पहिल्या सुर्योदयाचा व्हिडिओ

प्रितीच्या या पोस्टवर भरपूर प्रतिक्रिया येत असून पोस्ट शेअर केल्यानंतर अवघ्या काही मिनीटातच १ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हेही वाचा - 'दृष्यम २' चा टीझर रिलीज, ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रीमियर

ABOUT THE AUTHOR

...view details