मुबंई - कार्तिक आर्यनच्या आगामी 'लव्ह आज कल' चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यात कार्तिक आणि सारा अली खान वेगळ्या अंदाजमध्ये दिसतात. सध्या याची चर्चा सुरू असतानाच कमाल आर खानने एक खुलासा करत सगळ्यांनाच चकित केले आहे.
'लव आज कल' पोस्टरवर बॉलिवूड अभिनेत्याने केला चकित करणारा खुलासा - 'लव आज कल' पोस्टरवर बॉलिवूड अभिनेत्याने केला चकित करणारा खुलासा
कार्तिक आर्यनचा आगामी 'लव्ह आज कल' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच याचे पोस्टर रिलीज करण्यात आले. यावर बॉलिवूड अभिनेता कमाल आर खानने चकित करणारा खुलासा केला आहे.
कमाल आर खानने एक ट्विट करीत 'लव्ह आज कल' संबंधीचा खुलासा केलाय. त्याने ट्विटमध्ये म्हटलंय, ''दिग्दर्शिक इम्तियाज अली 'लव्ह आज कल'मध्ये कार्तिक आयर्नला साईन करण्यापूर्वी अनेक कलाकारांकडे गेले होते. एवढेच नाही तर शाहिद कपूरनेही चित्रपट करण्यास नकार दिला. आता पाहूयात बॉलिवूडचे सर्व कलाकार चुकीचे होते की, कार्तिक आर्यन चुकीचा आहे.'' अशा प्रकारची प्रतिक्रिया केआरकेने दिली आहे.
सोशल मीडियावर कमाल आर खान नेहमी सक्रिय असतो. तो स्वतःला समिक्षक म्हणवून घेतो. 'देशद्रोही' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'बिग बॉस'च्या तिसऱ्या पर्वात त्याने सर्वांचे लक्ष वेधले होते.