महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

लॉकडाऊन डायरी - अनुष्काने लुडोतून दिला सोशल डिस्टन्सचा संदेश, पाहा मजेदार पोस्ट - anushka and virat kohali news

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील आपल्या एका पोस्टद्वारे चाहत्यांना सोशल डिस्टन्स बाळगण्याचे आवाहन केले आहे.

LOCKDOWN Diaries Of VIRUSHKA, Anushka urge people for social distance by hilarious way
लॉकडाऊन डायरी - अनुष्काने लुडोतून दिला सोशल डिस्टंसचा संदेश, पाहा मजेदार पोस्ट

By

Published : Apr 20, 2020, 10:06 AM IST

मुंबई– सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता हे लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या कोणत्याही चित्रपटाचे, कार्यक्रमाचे किंवा मालिकांचे शूटिंग सुरू नाही. त्यामुळे सर्व कलाकार सामान्य नागरिकांप्रमाणे घरी बसून आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार चाहत्यांना घरी राहण्याचा सल्ला देतात. तसेच, सोशल डिस्टन्सच्या नियमांचं पालन करण्याचेही आवाहन करतात. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने देखील आपल्या एका पोस्टद्वारे चाहत्यांना सोशल डिस्टन्स बाळगण्याचे आवाहन केले आहे.

अनुष्काने आपल्या एका इन्स्टास्टोरीमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. वेळ घालवण्यासाठी विराट आणि तिच्या आई-वडिलांसोबत ऑनलाईन लुडो खेळत असताना सर्व तिच्या समोर होते. मात्र, अनुष्काचे सर्व खेळाडू घरातच होते. मात्र, ही आपली हार नसून मी घरीच राहत आहे. तसेच, सोशल डिस्टन्सचा अभ्यास करत आहे, असे आपल्या पोस्टमध्ये लिहून तिने मजेदार शैलीत चाहत्यांना देखील घरीच राहण्याचा सल्ला दिला.

लॉकडाऊन डायरी - अनुष्काने लुडोतून दिला सोशल डिस्टंसचा संदेश, पाहा मजेदार पोस्ट

अनुष्का आणि विराटचा एक आणखी धमाल व्हिडिओ देखील अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये अनष्का विराटला चाहत्यांच्या अंदाजात मैदानाची आठवण करून देताना दिसते. लॉकडाऊनच्या काळात दोघेही एकमेकांसोबत धमाल मस्ती करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराटने कोरोना विषाणूच्या लढ्यासाठी पंतप्रधान साहय्यता निधी तसेच, मुख्यमंत्री मदत निधीमध्ये मदत केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details