मुंबई- विद्युत जामवाल, पूजा चोप्रा आणि जयदीप अहलावत यांची मुख्य भूमिका असलेला ‘कमांडो’ रिलीज होण्यापूर्वीच निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने कमीतकमी तीन 'कमांडो' चित्रपटांची मालिका बनवण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाच्या मालिकेचा पहिला भाग 'कमांडो' रिलीजला आज ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी विपुल शाहने यशस्वी फ्रँचायझीचा चौथा भाग बनवल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
'कमांडो'जवर काम करतानाच्या जुन्या आठवणी विपुल शाह यांनी सांगितल्या, "जेव्हा मी विद्युतची पहिली ऑडिशन टेप पाहिली तेव्हा आम्ही 'फोर्स' चित्रपटासाठी व्हिलन शोधत होतो. टेप पाहिल्यानंतरच आम्ही ठरवलं होतं की आम्ही त्याला 'फोर्स' मधील खलनायक म्हणून कास्ट करू . परंतु आम्ही त्याला खरोखर एक अॅक्शन हिरो बनवू इच्छित होतो कारण तो अविश्वसनीय प्रतिभावान आहे आणि तेव्हापासून त्याचा एक विलक्षण प्रवास झाला आहे.
हेही वाचा -'कॅन्सल बोर्ड परीक्षा' याचिकेच्या मोहीमेत सोनू सूददेखील सामील
" 'कमांडो' चे शूटिंग एक मोठे आव्हान होते कारण आम्हाला अॅक्शन फिल्म बनवायची होती आणि अॅक्शन फिल्मना नेहमी बजेट लागते. आम्हाला हिमाचल प्रदेशच्या जंगलात शूट करायचे होते. या चित्रपटाची अंमलबजावणी करणे कठीण काम होते. रिलायन्स जोडीदार म्हणून येण्यापूर्वी मी जवळजवळ एक वर्ष या चित्रपटावर काम केले होते आणि आम्ही त्यावेळी निर्णय घेतला होता की आम्ही कमीतकमी 'कमांडो' चित्रपटांसह एकत्रीत पुढे जाऊ आणि आम्ही आता चौथ्या टप्प्यावर आलो आहोत याचा मला आनंद झाला आहे. आम्ही चांगल्या प्रकारे आमचे ध्येय गाठले आहे.'' असे त्यांनी पुढे सांगितले.