महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आतातरी सुशांतसिंह आत्महत्येचा तपास सीबीआयला करुद्या - मंत्री अस्लम शेख - Fisheries Development Minister Aslam Sheikh

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी आरोप-प्रत्यारोप दाखवून मीडियाला काही मिळणार नाही, चार्जशीट दाखल दाखल झाल्यानंतर न्यायालय योग्य तो निर्णय देईल, आता मीडिया ट्रायल नको, अशी प्रतिक्रिया मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

Aslam Sheikh
मंत्री अस्लम शेख

By

Published : Aug 26, 2020, 8:57 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येवरून सुरू असलेल्या मीडिया ट्रायलवर ताशेरे ओढत मत्स्य व्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांनी आता तरी सीबीआयला चौकशी करून चार्जशीट फाईल करू द्या, असा टोला लगावला.

अस्लम शेख म्हणाले, प्रसिद्धी माध्यमांमार्फत सुशांतसिंह प्रकरणाला सातत्याने प्रसिद्धी दिली जात आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात योग्य तपास करत असताना ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने आता हे प्रकरण सीबीआय'कडे तपासाला दिले आहे. सीबीआय तपास करणारी सर्वोच्च संस्था आहे. तपासाचे थेट प्रक्षेपण करून काही मिळणार नाही रे दादा, न्यायालयात चार्जशीट दाखल करू द्या, असेही शेख म्हणाले.

आरोप-प्रत्यारोप दाखवून मीडियाला काही मिळणार नाही, चार्जशीट दाखल दाखल झाल्यानंतर न्यायालय योग्य तो निर्णय देईल, आता मीडिया ट्रायल नको, अशी प्रतिक्रिया मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details