कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घरीच थांबा, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन - Lata Mangeshkar news
गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी घरीच थांबा, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे जनतेला आवाहन
मुंबई - जगभर वेगाने पसरलेला कोरोना विषाणू भारतातही झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉक डाऊन जाहीर केला. तसेच या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंवर एक ट्विट करून जनतेला घरीच थांबण्याचे आवाहन केले आहे.