मुंबई - ट्रान्सजेंडर व्यक्ती म्हणून लक्ष्मी बॉम्बमधील त्याची भूमिका ही त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीतील सर्वात "मानसिकदृष्ट्या तीव्र" भूमिका होती, असे अक्षय कुमारने म्हटलंय. "कोणत्याही समाजाला राग न आणता आपली कामगिरी बजावण्याबाबत काळजी घ्यावी लागेल'', असे अभिनेते अक्षय कुमार यांनी सोमवारी सांगितले.
लक्ष्मी बॉम्ब हा हॉरर-कॉमेडी चित्रपट हा २०११ च्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे आणि या सिनेमाचे दिग्दर्शन राघवा लॉरेन्स यांनी केले आहे.
एका पत्रकार परिषदेत, अक्षय कुमारने चित्रपटाच्या पात्राबद्दल सांगितले.
"माझ्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत, ही माझी सर्वात मानसिकदृष्या तीव्र भूमिका आहे. ही खूप कठीण आहे. यापूर्वी मी कधी असं काही अनुभवलं नव्हतं. त्याचे श्रेय माझ्या दिग्दर्शकाला, लॉरेन्स सरांना जाते. त्यांनी मला स्वतःच्या आवृत्तीत ओळख करून दिली'', असं अक्षयने पत्रकारांना सांगितले.
“मी आजपर्यंत केलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. कुठल्याही समाजाला दोष न देता ही व्यक्तिरेखा अत्यंत प्रामाणिकपणे दाखवण्याची मला काळजी घ्यावी लागली,” असे तो पुढे म्हणाला.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे थिएटर्स बंद आहेत. म्हणून लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट आता डिस्ने+हॉटस्टारवर डिजीटल स्ट्रिमिंग होणार आहे. हा चित्रपट अक्षयचा पहिला डिजिटल रिलीज असेल. आज अनावरण झालेल्या चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अक्षय साडीमध्ये दिसला आहे. साडी नेसणाऱ्या आणि सहजपणे आपली कामे करत राहिलेल्या महिलांचा आदर आहे, असेही तो म्हणाला.
"साडी नेसण्याचा मला अनुभव होता. ती वाहून नेणे अत्यंत अवघड आहे. परिधान करूनही चालत जाण्यासाठी मी धडपडत होतो. महिला किती चांगल्याप्रकारे हे मॅनेज करतात. त्याबद्दल त्यांना सलाम," असे अक्षय पुढे म्हणाला.
डिस्ने + हॉटस्टारने आपल्या सात चित्रपटांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिलीजची घोषणा केली, ज्यात अजय देवगणचा भुज: द प्राइड ऑफ इंडिया, अभिषेक बच्चन-स्टारर द बिग बुल, आणि सडक २ यासह आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला चित्रपट थेट प्रदर्शित होईल.