मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले आहे. बुधवारी रात्री त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांनी या जगाला निरोप दिला. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडला दुसरा धक्का बसला आहे. कालच (बुधवारी) इरफान खानचे निधन झाल्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत होती. त्यात आज पहाटेच ऋषी कपूर यांच्या निधनानेही कलाविश्वाला जबर झटका बसला आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांनीही त्यांचा एक जुना फोटो शेअर करुन आदरांजली वाहिली आहे.
'मी निःशब्द झालीये', ऋषी कपूर यांच्या निधनाबद्दल लतादीदींनी व्यक्त केल्या संवेदना - Lata shares rare photo with Rishi Kapoor
काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी लतादीदींना त्यांच्या बालपणीचा एक फोटो पाठवला होता. या फोटोत बालपणीचे ऋषी कपूर लतादीदींच्या कुशीत विसावलेले दिसतात. लता दीदींनी हाच फोटो शेअर करुन 'मी शब्दहिन झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच ऋषी कपूर यांनी लतादीदींना त्यांच्या बालपणीचा एक फोटो पाठवला होता. या फोटोत बालपणीचे ऋषी कपूर लतादीदींच्या कुशीत विसावलेले दिसतात. लता दीदींनी हाच फोटो शेअर करुन 'मी शब्दहिन झाली आहे. सर्व गोष्टी, सर्व आठवणी अजूनही आठवत आहेत, असे लिहिले आहे.
ऋषी कपूर यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीत कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. हे दु:ख सहन करणं खूप कठीण आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असेही लतादीदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
TAGGED:
Lata Mangeshkar latest news