मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अशात अभिनेत्याची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सुशांतनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन आईसोबतचा एक ब्लॅक अॅण्ड व्हाईट कोलाज फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेत्यानं लिहिलं, 'अश्रुंमधून अंधूक दिसणारा भूतकाळ. हास्य नष्ट करणारी न संपणारी स्वप्ने आणि एक क्षणभंगुर जीवन. दोघांमधील संवाद'. एम एस धोनी सिनेमाच्या प्रदर्शनाआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुशांतनं आईच्या आठवणींना उजाळा दिला होता. अभिनेता म्हणाला होता, आज माझं हे यश पाहण्यासाठी आई असायला हवी होती. तिला नक्कीच खूप आनंद झाला असता आणि माझा अभिमान वाटला असता.