मुंबईः आमिर खान आणि करिना कपूर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आमिर खानचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यात आमिर खान सरदारच्या गेटअपमध्ये दिसत आहे.
पोस्टरमध्ये आमिरखान ट्रेनच्या बर्थवर बसलेला दिसत आहे. तो अतिशय साध्या वेशभूषेत दिसत आहे. एका सामान्य सरदारची व्यक्तीरेखा साकारत असल्याचे फर्स्ट लूकवरून लक्षात येतो.