हैदराबाद : कोरोना व्हायरसनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांच्या रिलीज तारखा जाहीर केल्या आहेत, त्यामुळे अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या शर्यतीत एकमेकांशी भिडले आहेत. अलीकडेच, लाल सिंग चड्ढाची (Lal Singh Chadha) नवीन रिलीज डेट समोर आली असून हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. याच दिवशी अभिनेता यशचा KGF 2 हा चित्रपट रिलीज होणार आहे.
आमिर खान आणि करिना कपूरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट पुढील वर्षीच्या बैसाखीच्या मुहूर्तावर 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वत: करिना कपूर आणि चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर नवीन पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. 'लाल सिंह चड्ढा'चे नवीन पोस्टर (New poster of 'Lal Singh Chadha') समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.