काल परवापर्यंत घटस्फोटामुळे बातम्यांमध्ये झळकलेला आमिर खान पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. यावेळी तो चांगल्या कारणासाठी चर्चेत नाही तर प्रदूषण पसरवीतअसल्याचा आरोप त्याच्यावर गावकऱ्यांनी केला आहे. त्याचे झाले असे की आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाचं शूटिंग सध्या लडाखमध्ये सुरु आहे. मात्र ज्या ठिकाणी या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे तेथील ग्रमस्थांनी सिनेमाच्या टीमवर प्रदूषण पसरवीत असल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत लडाखमधील एक गाव दिसत असून या परिसरात पसरलेला प्लास्टिक कचरा फेकून दिल्याचे दिसत आहे.
व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की "बॉलिवूड स्टार आमिर खानच्या आगामी लाल सिंग चढ्ढा चित्रपटाने लडाखच्या वाखा गावाला दिलेली ही भेट आहे. आमिर स्वतः सत्यमेव जयतेमध्ये पर्यावरणाच्या स्वच्छतेबद्दल मोठ्या बाता मारत असतो परंतु जेव्हा स्वतःवर वेळे येते हे असं असतं."
काही दिवसांपूर्वीच लडामधील ‘लाल सिंह चड्ढा’ च्या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो खूप चर्चेत होता. यात आमिर खान घटस्फोटानंतर पहिल्यांदाच किरण रावसोबत सेटवर दिसला होता. यात किरण, आमिर आणि नागा चैतन्य दिसले होते. टॉम हॅक्सच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमावर आधारित लाल सिंग चढ्ढाची कथा आहे. याचे शुटिंग लडाखमध्ये सुरू आहे. याच काळात टीमने कचरा केल्यामुळे आमिर वादात अडकला आहे.
हेही वाचा - भन्साळींचा 'देवदास' झाला १९ वर्षांचा, २० कोटींचा सेट असलेला पहिला सिनेमा