मुंबई - आमीर खानने अक्षय कुमार याची प्रमुख भूमिका असलेल्या हॉरर कॉमेडी 'लक्ष्मी बॉम्ब'च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज व्हावा, अशी अपेक्षाही आमीरने व्यक्त केली आहे.
'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज व्हावा - आमीर खान - Akshay Kumar latest news
आमीर खानने अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'च्या ट्रेलरचे कौतुक केले आहे.हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज व्हावा, अशी अपेक्षाही आमीरने व्यक्त केली आहे.
आमिर खान
लक्ष्मी बॉम्बबद्दल आमीर खानने एक ट्विट केले आहे. त्याने लिहिलंय, ''प्रिय अक्षय कुमार, ट्रेलर किती शानदार झालाय. हा चित्रपट पाहण्यासाठी मी फार काळ प्रतीक्षा करु शकत नाही. तुझा परफॉर्मन्स लाजवाब झालाय. सर्वांना शुभेच्छा.''
आमीर खानच्या या ट्विटला अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. या कठीण काळात असा उत्साह वाढवणे खूप मोठी गोष्ट आहे, असे अक्षयने म्हटले आहे.