महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कुछ कुछ होता है फेम बाल अभिनेता परझान दस्तूरचा डेल्नासोबत झाला विवाह - कभी खुशी कभी गम

शाहरुख खान, काजोल आणि राणी यांच्या भूमिका असलेल्या कुछ कुछ होता है चित्रपटामध्ये छोट्या शीख मुलाची भूमिका साकारणारा बाल अभिनेता परझान दस्तूर आपल्याला आठवत असेल. हा गोड मुलगा आता बोहल्यावर चढला आहे. मुंबईत एका परंपरिक विवाह सोहळ्यात त्याने मैत्रीण डेल्ना श्रॉफसोबत लग्नगाठ बांधली.

Parzaan Dastur marries GF Delna Shroff
परझान दस्तूरचा डेल्नासोबत झाला विवाह

By

Published : Jan 5, 2021, 6:49 PM IST

मुंबई : कुछ कुछ होता है फेम चाईल्ड अभिनेता परझान आता लग्नाच्या बोहल्यावर चढला आहे. मुंबईतील एका पारंपरिक विवाह सोहळ्यात गर्लफ्रेंड डेल्ना श्रॉफसोबत परझानने लग्नगाठ बांधली.

कहो ना प्यार है, मोहब्बतें आणि कभी खुशी कभी गम यासारख्या चित्रपटांमध्ये आपल्या गोंडस रूपांनी अनेकांची मने जिंकणारी बाल अभिनेता परझान एक देखणा व्यक्ती बनला आहे. नुकतेच त्याने मुंबईत दीर्घ काळ प्रेमिका असलेल्या डेल्नाशी लग्न केले. या लग्नसोहळ्याला त्यांच्या नात्यातील मोजके लोक उपस्थित होते.

परझान दस्तूरचा डेल्नासोबत झाला विवाह

परझानने इंस्टाग्रामवर डेल्नासोबत लग्न झाल्याची घोषणा सोशल मीडियावरुन केली. यावेळी दोघेही पारंपरिक पारशी वेशभूषेत होते.

परझान दस्तूरचा डेल्नासोबत झाला विवाह

लग्नाचे फोटो शेअर करताना परझानने लिहिले, "आपल्या सर्वांनी प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आपले आभारी आहे! आम्ही एक सुंदर सोहळा आयोजित केला होता आणि आम्हाला आशीर्वाद देऊन धन्यवाद दिल्याबद्दल प्रत्येकाचे मी आभार मानू शकत नाही."

हेही वाचा - रिचा चढ्ढाचा "मॅडम चीफ मिनीस्टर" चित्रपट २२ जानेवारीला होणार थिएटरमध्ये रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details