महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पानिपत : पार्वतीबाईची भूमिका पाहून कृतीच्या बहिणीने लिहिली भावूक पोस्ट - Asutosh Govarikar latest news

पानिपत रिलीज झाल्यानंतर कृती सेननची बहिण नुपूरने बहिणीसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. या चित्रपटातील एका सीन्सवर ती प्रचंड फिदा झाली आहे.

Panipat
पानीपत

By

Published : Dec 7, 2019, 12:02 AM IST


मुंबई- अभिनेत्री कृती सेनॉनची बहिण नुपूर सेनॉन हिने आशुतोष गोवारीकरांचा पानिपत चित्रपट पाहिल्यानंतर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. तिने कृतीने साकारलेली भूमिका पाहून ही पोस्ट लिहिली आहे.

पानिपत चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्यादिवशी उत्तम प्रतिसाद मिळालाय. १८ व्या शतकात पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठा सैन्याचा पराभव झाला होता. या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. यात सदाशिवराव भाऊ (अर्जुन कपूर) ची पत्नी पार्वतीबाईची भूमिका कृती सेनॉनने साकारली आहे. यातील विवाहाप्रसंगीचा शॉट नुपूरला प्रचंड आवडलाय.

नुपूरने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय, ''माझ्यासह ज्यांनी हा शानदार शॉट पाहिला आहे, तो प्रत्येकजण पार्वतीबाईच्या व्यक्तीरेखेच्या प्रेमात पडेल. आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकत एखादी महिला कोणत्या स्तरापर्यंत पोहोचू शकते, मजबूतपणे लढू शकते. आपल्यासाठी, आप्तांच्या रक्षणासाठी तलवार उपसू शकते. ती एक अशी महिला आहे जी आपल्या अंतःकरणात शुध्द प्रेम बाळगते.''

नुपूरच्या म्हणण्यानुसार कृतीचे पानीपतमधील काम आजवरचे सर्वोत्कृष्ट झाले आहे. ती पुढे लिहिते, ''तू चमकली आहेस!! समर्पण, कठोर मेहनत आणि प्रामाणिकपणा प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येतो.''

कृतीच्या बहिणीने म्हटलंय की, तिचे सिनेमाबद्दलचे म्हणणे पक्षपाती नाही. तर भारतीय प्रेक्षकांनी इतिहास समजून घेण्यासाठी पानिपत जरूर पाहावा, असे आवाहनही तिने केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details