मुंबई- 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सेनॉन लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत या चित्रपटाबद्दलची माहिती दिली आहे.
क्रितीच्या आगामी चित्रपटाची घोषणा, 'रईस'च्या दिग्दर्शकासोबत करणार काम - heropanti
क्रिती सेनॉन लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. 'रईस' चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल ढोलकिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.
'रईस' चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल ढोलकिया या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असून चित्रपटाचे शीर्षक अद्याप निश्चित झाले नाही. बिलाल सिद्दीकी यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.
चित्रपटातील इतर कलाकारांची नावं अद्याप समोर आलेली नाही. लुका छुपी आणि बरेली की बर्फी यांसारख्या हिट चित्रपटांनंतर आता या महिला केंद्रीत थ्रिलर चित्रपटात भूमिका साकारण्यासााठी उत्सुक असल्याचं क्रितीनं म्हटलं आहे. दरम्यान याशिवाय क्रिती 'अर्जून पटियाला', 'पानिपत' आणि 'हाऊसफुल्ल ४' या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.