मुंबई- 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या क्रिती सेनॉनने यांनतरही अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. तिच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'लुका छुपी' चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर आता क्रिती लवकरच 'अर्जुन पटियाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील क्रितीच्या भूमिकेवरूनही पडदा उठला आहे.
'अर्जून पटियाला'मध्ये क्रिती सेनॉन झळकणार क्राईम जर्नालिस्टच्या भूमिकेत - crime journalist
चित्रपटात ती एका क्राईम रिपोर्टरच्या भूमिकेत झळकणार असल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना तिने याबद्दल खुलासा केला आहे
चित्रपटात ती एका क्राईम रिपोर्टरच्या भूमिकेत झळकणार असल्याचे समोर आले आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना तिने याबद्दल खुलासा केला आहे. चित्रपटाला काहीसा पंजाबी टचदेखील असणार आहे. या चित्रपटात क्रिती दिलजित दोसांजसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर वरूण शर्माही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित जुगराज हे असून भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि दिनेश विजन यांचं दिग्दर्शन आहे. येत्या १९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.