मुंबई - 'हिरोपंती' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या क्रिती सेनॉनने नुकतंच 'लुका छुपी' चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली. आता क्रिती आपल्या आगामी 'अर्जून पटियाला' या विनोदी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. तर नुकतंच तिनं 'पानिपत' चित्रपटाचं चित्रीकरणही पूर्ण केलं आहे.
क्रितीनं पूर्ण केलं 'पानिपत'चं चित्रीकरण, अर्जूनसाठी शेअर केली खास पोस्ट - arjun kapoor
नुकतंच क्रितीनं 'पानिपत' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.या चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने क्रिती पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. 'पानिपत'च्या तिसऱ्या युद्धावर आधारित असणाऱ्या या चित्रपटात अर्जून कपूर आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच क्रितीनं या चित्रपटाचं आपलं शेड्यूल पूर्ण केलं आहे. इन्स्टाग्रामवरून अर्जून आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत तिनं याबद्दलची माहिती दिली आहे.
पहिल्या फोटोत क्रितीनं अर्जूनच्या तोंडावर हात ठेवला आहे. याला शांत करण्याचा दुसरा कोणताच मार्ग नाही. तु दिलेल्या प्रेमासाठी आणि माझा सहकलाकार म्हणून काम करण्यासाठी आभारी आहे. आपण हा प्रवास सोबत केला याचा आनंद आहे आणि यामुळेचं मला एक उत्तम मित्र मिळाला असल्याचे क्रितीने म्हटले आहे. तर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आपल्याला चित्रपटातील पार्वतीचे पात्र साकारण्याची संधी दिली, यासाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत.