मुंबई - अभिनेता अक्षय कुमार, प्रीती झिंटा, अजय देवगण, इशा गुप्ता, आणि श्रद्धा कपूर यांनी शुक्रवारी संध्याकाळी एअर इंडिया एक्सप्रेस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या प्रवाशांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपल्या सोशल मीडियावरुन प्रार्थना व्यक्त करीत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या घटनेबद्दल शोक व्यक्त करत अभिनेता अक्षय कुमारने ट्वीट केले की, "भयानक बातमी! # एअर इंडिया एक्सप्रेस विमानात बसलेल्या सर्व प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो."
पायलटच्या निधनाबद्दल इशा गुप्ता यांनी दु: ख व्यक्त केले आणि ट्विट केले की, "कॅप्टन दीपक वसंत साठे सर यांचे कुटुंबीय व प्रियजन यांच्याबद्दल प्रार्थना आणि संवेदना. ते फक्त नियमित प्रशिक्षित पायलट नव्हते, त्यांनी आयएएफमध्ये प्रायोगिक चाचणी पायलट म्हणूनही काम केले होते. आरआयपी सर #AirIndiaExpress. "
प्रीती झिंटा यांनी प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त केला आणि ट्विट केले की, "कोझीकोड विमानतळावर एअर इंडियाच्या विमान अपघाताविषयी ऐकून दुःख झाले. विमानातील प्रवाशांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी प्रार्थना. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांचे कुटुंब आणि मित्र यांच्यासाठी संवेदना.''
अजय देवगण यांनी ट्विटरवर लिहिले की, "सर्व प्रवासी आणि चालक दलातील सर्व सदस्यांबरोबर मी प्रार्थना करतो आणि ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याबद्दल मनःपूर्वक शोक व्यक्त करतो."